Beed Burglary Case : अंबाजोगाई परिसरातील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
Beed Burglary Case
अंबाजोगाई परिसरातील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक
Published on
Updated on

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ, बाराभाई गल्ली परिसरात झालेल्या घरफोडीचा अंबाजोगाई पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास केला. घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी शनिवारी (दि.७) अटक करून त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Beed Burglary Case
Udgir burglary case : उदगीरमध्ये घरफोडी; 4.90 लाख रुपयांचा ऐवज पळवला

याबाबत माहिती अशी, फिर्यादी काझी मोहम्मद अलीमुद्दीन करीमुद्दीन ( रा. बाराभाई गल्ली अंबाजेगाई) यांच्या बंद घरात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री १.२५ वाजता दोन चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चार लाखाची रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा ११ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीनी अंबाजोगाई पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित पठाण मोहम्मद रियाज खान (वय २५, रा. बाराभाई गल्ली) व सलमान मुस्तफा शेख (वय ३१, रा. झारेगल्ली, अंबाजोगाई) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Beed Burglary Case
Pachgaon Burglary Case | पाचगावमध्ये बंगला फोडला; दहा तोळे सोने, रोकड लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news