

उदगीर : शहरातील नांदेड रोडवरील गायकवाड अपार्टमेंटमधील एका घराचे कुलूप कोंडा तोडून कपाटातील रोख रक्कम 1 लाख 80 हजार रुपये व 3 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असे एकुण 4 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
याप्रकरणी मंगळवारी 27 जानेवारीरात्री साडेअकराच्या सुमारास संध्याराणी महादेव जळकोटे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 जानेवारी रोजी सायंकाळी चार ते साडेसहाच्या दरम्यान शहरातील गायकवाड अपार्टमेंट नांदेड नाका उदगीर येथे अज्ञात आरोपीने फिर्यादीचे घराचे दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटामध्ये ठेवलेले रोख रक्कम 1 लाख 80 हजार व सोन्याचे दागीने 5 ग्रॅम चे 4 अंगठ्या किंमत 1 लाख रुपये, साडेतीन ग्रॅमचे 3 अंगठ्या किंमत अंदाजे 50 हजार रुपये, 1 तोळा 12 ग्रम चे कानातील झुमके किंमत अंदाचे 1 लाख रुपये, दिड तोळ्याचे लॉकेट किंमत अंदाजे 60 हजार रुपये, असा एकूण 6 तोळे 2 ग्रॅमचा मुद्देमाल किंमत 3 लाख 10 हजार रूपये व रोख रक्कम 1 लाख 80 हजार रुपये असा एकूण 4 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.
पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
उदगीर शहरातील वाढती गुन्हेगारी पाहून पोलिसांच्या कार्य शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. उदगीर शहरात गुन्हेगारी वाढल्यामुळे सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतील का? असे सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.