बीड : पोटच्या लेकीवर पित्यानेच केला अत्याचार

बीड : पोटच्या लेकीवर पित्यानेच केला अत्याचार

Published on

धारूर, पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई तालुक्यात बापाच्या नावाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ४१ वर्षीय पित्याने दारू पिऊन, मारहाण करत पोटच्या लेकीवर अत्याचार केला, त्यात मुलगी आठ महिन्याची गर्भवती राहिली आहे. पोटात दुखायला लागल्यानंतर आईने रूग्णालयात नेले असता मुलीने आपबिती सांगितली. मुलीच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिडीत मुलीचे कुटुंब ऊसतोडणीचे काम करते. यावर्षी रांजणी कारखान्याला हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून गेले आहे. तेथे काम करत असताना मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने तिने आईला सांगितले. आईने तिला अंबाजोगाई येथे ६ फेब्रुवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याच सांगितलं. अधिक चौकशी केल्यानंतर मुलीने वडिलांनीच मागील आठ महिन्यांपूर्वी घरी आई बाहेर गेल्यानंतर दारू पिऊन, मारहाण करत अत्याचार केल्याची आपबिती सांगितली. मुलीच्या फिर्यादीवरून नराधम वडीलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिडीमार पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोळंके करत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news