बीड : १५ हजारांच्या लाचप्रकरणी एलसीबीच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा | पुढारी

बीड : १५ हजारांच्या लाचप्रकरणी एलसीबीच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : वाळूचा हायवा चालू राहण्यासाठी खासगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच घेतल्याप्रकरणी बीडच्या  एसीबीने स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका हायवा चालकाकडून गेवराईत १५ हजारांची लाच घेण्यात आली असता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी सर्रास सुरु आहे. संगम जळगाव (ता. गेवराई) येथील हायवा चालकास गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करून शेवगावमध्ये (जि. नगर) वाहतूक करण्यासाठी एलसीबीचा कर्मचारी मुकेश गुंजाळ याने पंधरा हजाराची लाच मागितली. ही लाच गुंजाळ याच्यासाठी स्वीकारताना हॉटेल साईचा मालक प्रमोद कोठेकर याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीसासह खासगी व्यक्तीविरुध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी, स्नेहल कोरडे यांनी केली.

हेही वाचा

Back to top button