

Awargaon first in cleanliness campaign competition
धारूर, पुढारी वृासेवा : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा २०२४ २५ मध्ये आवरगाव ग्रामपंचायतने पटकावला. आता पुन्हा एकदा राज्यस्तरीय स्पर्धेत या ग्रामपंचायतीची निवड झाली आहे त्यामुळे या ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायतच्या या कामगिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी कौतूक केले आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना २०२४- २५ मध्ये जिल्हास्तरीय तपासणी पथकाचा निकाल हा नुकता जाहीर करण्यात आला असून विभागीय स्तरावर प्रथम व द्वितीय ग्रामपंचायत यांची तपासणी लवकरच होणार असून त्या बक्षिसासही पात्र आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक धारूर तालुक्यातील आदर्श असणारी व राज्यभरात नावाजलेली आवरगाव ग्रामपंचायत ने पुन्हा एकदा यावर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
केज तालुक्यातील कोल्हेवाडी ही ग्रामपंचायत जिल्ह्यात द्वितीय तर पाटोदा तालुक्यातील उंबरवीहीरा या ग्रामपंचायतने तृतीय क्रमांक पटकावला आहे. विशेष पुरस्कारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणीपुरवठा व गुणवत्ता शिरसमार्ग या गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत ने मिळवला आहे तर वडवणी तालुक्यातील साळिंबा ग्रामपंचायत ने वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन मध्ये मिळवला आहे.
शिरूर तालुक्यातील नांदेवाडी या ग्रामपंचायतीने स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार स्वच्छालय व्यवस्थापन हा मिळवला आहे. या ग्रामपंचायतीचा निकाल जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन रहमान यांनी जाहीर केला असून प्रकल्प संचालक राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन यांना कळवला आहे. या यशस्वी ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आवरगाव ग्रामपंचायत ने पुन्हा एकदा हे यश मिळवल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून सरपंच अमोल जगताप व ग्राम विकास अधिकारी बालासाहेव झोंबाडे यांचे व ग्रामस्थांचेही या कार्याबद्दल कौतुक होत आहे. विभाग व राजस्तरीय स्पर्धेत ही आवरगाव ग्रामपंचायत अव्वल ठरेल असा विश्वास सरपंच अमोल जगताप यांनी व्यक्त केला आहे.