

Archana Kute CID custody
गौतम बचुटे
केज : ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी सीआयडी पथकाने पुणे येथे ताब्यात घेतलेल्या अर्चना कुटे यांना आज (दि. १७) पहाटे ४ वाजता पुणे येथून केज येथे आणण्यात आले होते. त्यांना आज दुपारी केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना केज येथील दुसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयाने दि. १९ सप्टेंबर पर्यंत तीन दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या उपअधीक्षक स्वाती थोरात या करीत आहेत. अर्चना कुटे यांच्यावर केज आणि नांदुरघाट येथील ठेवीदारांच्या ठेवी बुडविल्याचा आरोप आहे. तीन दिवसांपूर्वी सीआयडी च्या पथकाने त्या वापरीत असलेली बीएम डब्ल्यू कंपनीची सुमारे १७ लाख किंमतीची एक दुचाकी केज पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आलेली आहे.