Beed Firecrackers Seized : अवैध फटाक्यांच्या साठ्यावर छापा

आष्टी पोलिसांची कारवाई; आठ लाखांचा माल जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

आष्टी : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आष्टी तालुक्यातील कडा येथील बाजारतळ परिसरात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने अचानक छापा टाकून तब्बल आठ लाख रुपये किमतीचा फटाक्यांचा साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसाय करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कडा येथील बाजारतळ परिसरात शेख बनिमिया यांच्या गोदामामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फटाके साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.

Crime News
Beed Encroachment Removal : ऐन सणासुदीच्या काळात अतिक्रमणावर हातोडा

या कारवाईदरम्यान सुमारे आठ लाख रुपये किमतीचा फटाक्यांचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांची मागणी वाढत असताना त्यांची साठवणूक आणि विक्री करताना आवश्यक परवानग्या, सुरक्षिततेचे नियम आणि संबंधित कायदेशीर अटींचे पालन करणे महत्त्वाचे असते.

फटाक्यांसारख्या ज्वलनशील वस्तूंची नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केल्यास आग लागण्याचा किंवा स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः बाजारतळासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा साठवणुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.

Crime News
Jalna Crime : पालकांनो सावधान ! अल्पवयीन मुलांच्या हातात तलवारी, खुनाच्या गुन्ह्यात समावेश

संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू

या प्रकरणात संबंधित शेख बनिमिया यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या तपासातून या साठ्याबाबतची अधिकृत माहिती आणि पुढील कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. दिवाळीच्या सणात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे अवैध साठवणूक, नियमबाह्य विक्री आणि संभाव्य दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकणार्‍या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.