Beed Encroachment Removal : ऐन सणासुदीच्या काळात अतिक्रमणावर हातोडा

अंबाजोगाईत नगर परिषदेची कारवाई; व्यावसायिकांमध्ये नाराजी
Beed Encroachment Removal
Beed Encroachment Removalpudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातून जाणार्‍या राज्यरस्त्याच्या रुंदीकरणासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयापर्यंत रस्त्यालगत असलेली अतिक्रमण शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंबाजोगाई नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हटवण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात काढण्यात आलेल्या या अतिक्रमण कार्यवाहीमुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केल्या जात आहे. ही अतिक्रमणे उठवण्यासाठी जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर, टिप्पर अशा मोठ्या वाहनांचा वापर करण्यात आला. ही अतिक्रमण कार्यवाही बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत होती.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते सदरबाजार चौक या रस्त्यादरम्यानची गेली काही दिवसापासून रखडलेली अतिक्रमणे तगड्या पोलीस बंदोबस्तात आज काढण्यात आली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशा सूचना अतिक्रमणधारकांना काही दिवसापासून सतत देण्यात आल्या होत्या. परंतू या सुचनेकडे काही जणांनी दुर्लक्ष केले.

Beed Encroachment Removal
Beed Five Star MIDC Project : शेतकर्‍यांच्या मर्जीविरुध्द एमआयडीसीसाठी भूसंपादन होणार नाही

आज अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना नाईलाजाने अतिक्रमण करण्यात आलेल्या बर्‍याच जणांच्या दुकानावर आणि घरांवर जेसीबीचा फावडा फिरवला.अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते - ‘स्वाराती’ रुग्णालय - यशवंतराव चव्हाण चौक या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा सार्वजनिक बांधकाम विभागाला होत होता.

त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे पुन्हा काढली जाणार आहेत, अशी चर्चा होती. त्याला दिवाळीपूर्वी मुहूर्त सापडला आणि शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. शुक्रवारपासून शहरात ही मोहीम वेगाने सुरू झाली.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आणि सदरबाजार परिसरातील अतिक्रमणे काढताना तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Beed Encroachment Removal
Jalna Crime : पालकांनो सावधान ! अल्पवयीन मुलांच्या हातात तलवारी, खुनाच्या गुन्ह्यात समावेश

सार्वजनिक बांधकाम विभागाची पुर्ण टीम या ठिकाणी हजर राहून अतिक्रमणे काढत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते. अतिक्रमणे काढताना बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.