Beed crime : जिल्हा परिषद शाळेत व्हिडीओ शूटिंग; शिक्षिकेशी गैरवर्तन

शिक्षकांना धमकावल्याचा आरोप; अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

आष्टी : आष्टी तालुक्यातील बांदखेल जिल्हा परिषद शाळा तसेच दौलवडगाव अंतर्गत आनंदवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत परवानगीशिवाय व्हिडीओ शूटिंग करून शिक्षकांना धमकावणे, तसेच महिला शिक्षिकेशी अर्वाच्य भाषेत बोलून दमदाटी व विनयभंग केल्याच्या आरोपावरून शिवाजी परभणे याच्याविरुद्ध अंभोरा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा, बीडकडूनही त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

शिवाजी परभणे हा बांदखेल येथे महा-ई-सेवा केंद्र चालवितो. शिक्षक त्याच्याकडे काम करत नसल्याच्या कारणावरून त्यांच्याबाबत नाराजी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी विद्यार्थी शाळेबाहेर गेले असताना परभणे हा बांदखेल येथील जिल्हा परिषद शाळेत गेला.

Crime News
Jalna Sina Riverfront project : सीना नदीकाठी नवा ऑक्सिजन झोन होणार

यावेळी त्याने मुख्याध्यापकांशी दमदाटी करत शाळेचा व्हिडीओ शूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.यानंतर आनंदवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक सुरेश कुटे कार्यालयात असताना परभणे याने ‌‘मुले कुठे आहेत?‌’ असा जाब विचारत शाळेतील व्हिडीओ शूटिंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित प्रकारामुळे शाळेतील शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

शिक्षिकेला धमकी दिल्याचा आरोप

दुसऱ्या दिवशी पुन्हा आनंदवाडी येथील शाळेत जाऊन उपस्थित असलेल्या शिक्षीकेशी मुख्याध्यापक सुरेश कुटे यांच्या उपस्थितीत अर्वाच्य भाषेत बोलून दमदाटी केल्याचा आरोप आहे. तसेच ‌‘तुमचे अधिकारी माझ्यासमोर लटलट कापतात, तुझी नोकरी घालवीन,‌’ अशी धमकी देत रजिस्टर व अर्ज मागून त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शाळेत त्रयस्थ व्यक्तीकडून अशा प्रकारे व्हिडीओ शूटिंग करण्यास परवानगी नसतानाही संबंधित व्यक्तीने शाळेत येऊन शिक्षकांना त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकारानंतर सहशिक्षिका यांनी अंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Crime News
Jalna water theft : पाणीचोरी विरोधात सिरसवाडी, दरेगावचे नागरिक आक्रमक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news