Beed Politics : राजकीय अस्तित्वासाठीच आक्रोश मोर्चा

बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चावर आ. सुरेश धस यांची टीका; गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे सर्वेक्षण पूर्ण
Beed Politics
आ. सुरेश धसpudhari photo
Published on: 
Updated on: 

आष्टी : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे एकत्र आले असून, शासनाच्या विरोधात काढण्यात येणारा आक्रोश मोर्चा हा विकासाच्या प्रश्नापेक्षा आगामी राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून आयोजित करण्यात आल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. शासनाच्या विरोधातील या मोर्चात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

आष्टी तालुक्यातील राजकीय विरोधक भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांनी आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष पत्रकार परिषदेत आमदार धस बोलत होते. यावेळी शिरूर कासार तालुका भाजपाध्यक्ष सुरेश उगलमुगले उपस्थित होते.

Beed Politics
Jalna Ganesh Visarjan : जालना शहरात ३४ तास चालले श्री गणेश विसर्जन

आमदार धस म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भीमराव धोंडे यांनी अपक्ष म्हणून, तर बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली. आपण भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून सुमारे ८० हजार मतांनी विजयी झालो. दोन्ही नेत्यांचा पराभव झाल्यानंतर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते एकत्र आले असून, ‌‘हम साथ साथ हैं‌’ दाखविण्यासाठीच हा मोर्चा काढला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

पाटोदा व शिरूर कासार तालुक्यासह आष्टी तालुक्यातील काही दुष्काळी गावांसाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे धस यांनी स्पष्ट केले.

Beed Politics
Nanded Crime : नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

७ जानेवारी २०२५ रोजी जायकवाडी प्रकल्पातून उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करण्याची मागणी करणारे पत्र शासनाला दिले.

३.५७ टीएमसी पाणी; २० हजार हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट

‘पाटोदा-शिरूर कासार उपसा सिचन योजना’ या माध्यमातून जायकवाडी प्रकल्पातून सुमारे ३.५७ टीएमसी पाणी उचलण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेद्वारे सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे धस यांनी सांगितले. गहिनीनाथ गड परिसरात वितरण कुंड उभारून पुढे बंदिस्त नलिकेद्वारे पाणी विविध भागांत पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गहिनीनाथ गड येथून पिंपळवंडी, पाटोदा, रोहतवाडी आणि थेरला आदी भागांत पाणी साठवणुकीची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे.

सरकारच्याच विरोधात मोर्चा

एकीकडे महायुतीचे घटक पक्ष असल्याचे सांगायचे, विकासकामांसाठी शासनाकडे निधी मागायचा आणि दुसरीकडे त्याच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावून शासनाच्या विरोधात मोर्चा काढायचा, ही भूमिका विसंगत असल्याची टीका धस यांनी केली. पाटोदा व शिरूरच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रक्रिया सुरू असताना जिल्हाधिकारी आणि गोदावरी खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विनाकारण चकरा मारण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news