Jalna Ganesh Visarjan : जालना शहरात ३४ तास चालले श्री गणेश विसर्जन

५१९ सार्वजनिक तर ७० ते ८० हजार घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन
Jalna Ganesh Visarjan
विसर्जन स्थळावर झालेली नागरिकांची गर्दी (छाया : किरण खानापुरे / अनिल व्यवहारे)
Published on: 
Updated on: 

जालना : जालना शहर महानगरपालिकेमार्फत मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे शहरातील गणेश विसर्जन सोहळा शांततापूर्ण व सुरळीतरीत्या पार पडला.

जालना शहरात शुक्रवार (२५)रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू असलेली विसर्जन प्रक्रिया जवळपास ३४ तास अखंड सुरू होती. शनिवार(२६) रोजी सायंकाळी साडेसहावाजेपर्यंत शहरातील ५१९ सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन पूर्ण करण्यात आले.

Jalna Ganesh Visarjan
Jintur farmers protest : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

त्याचबरोबर शहरातील घरगुती गणेशोत्सव तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने व दुकानांमधील गणेश मूर्ती मिळून अंदाजे ७० ते ८० हजार श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनाची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत पार पाडण्यात आली.

मोती तलाव येथील विसर्जन कुंडावर मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींच्या सुरक्षित विसर्जनासाठी ६ क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच घरगुती गणेश मूर्तींसाठी १० कृत्रिम विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात आले होते. मूर्ती दानासाठी स्वतंत्र पथकेही तैनात करण्यात आली होती.

Jalna Ganesh Visarjan
Sunetra Pawar : शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही

विसर्जनादरम्यान सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलिस प्रशासन, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा कर्मचारी तसेच जीव रक्षक दलाचे सदस्य विसर्जनस्थळी कार्यरत होते.

स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक नियोजन, विसर्जन व्यवस्था व आपत्कालीन व्यवस्थापनासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केले. या संपूर्ण विसर्जन प्रक्रियेत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, माऊली प्रतिष्ठान तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य केले.

जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा , पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने विसर्जनाचे नियोजन केले होते. संबंधित अधिकारी व कर्मचारी जवळपास ३४ तास सातत्याने कार्यरत राहून विसर्जन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होते.मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करीत युवकांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला होता.गुलालाची उधळण केल्याने रस्ते रंगुन निघाले होते.

जालना शहरातील मामा चौकातून शुक्रवारी श्री गणेश मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ.अर्जुनराव खोतकर, माजी आ.कैलाश गोरंट्या‌ल, भाजपा शहर महापालिकेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे, उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news