Beed robbery : माळेगांव येथे सशस्त्र दरोडा; साडेचार लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी पळविला

Robbery Case : युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Robbery Case
प्रातिनिधिक छायाचित्रfile photo
Published on
Updated on

केज : केज तालुक्यातील माळेगाव येथे महिलेला धारदार शस्राचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या गळ्यातील सोने आणि रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री ३.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Robbery Case
Kolhapur Robbery | कसबा सांगावमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरी; १५ तोळ्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

केज तालुक्यातील माळेगांव येथील आण्णा कोंडीराम चाळक यांच्या घरी गुरूवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चाळक यांच्यासह त्यांच्या पत्नीला धारदार शस्राचा धाक दाखवून पत्नीच्या गळ्यातील दागिने व कपाट फोडून ४ लाख ४४ हजाराचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात दरोडेखोराविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे तपास करीत आहेत.

Robbery Case
ATM Robbery | हे कसं घडलं? चोरट्यांनी ATM न फोडता काढले १० लाख रुपये, बँकेसह पोलिसही चक्रावले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news