

Gold and cash stolen in Kasba Sangav
कसबा सांगाव : कसबा सांगाव (ता. कागल) येथील वाकी वसाहतीतील एका बंद घराचे कुलूप तोडून मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने , ९०० ग्रॅम चांदी , रोख पन्नास हजारहून अधिक रकमेची चोरी केल्याने खळबळ उडाली आहे.
वाकी वसाहतीतील रहदारीच्या ठिकाणी असणाऱ्या घरातील लोक आपल्या मूळ गावी राधानगरी तालुक्यातील वाकी येथे गेले होते. यावेळी चोरीचा प्रकार घडला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे विद्युत पुरवठा बंद होता. याचा फायदा घेत अज्ञातांनी घराचे कुलूप तोडून चोरी केली. आज दुपारी बाराच्या सुमारास कुटुंबातील लोक घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी श्वान पथक बोलवण्यात आले होते. ठसे तज्ज्ञ ही बोलवण्यात आले आहेत. कागल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक वैभव जमादार, गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आदीसह श्वानपथकाने ठसे तज्ञांनी भेट देऊन तपास गतिमान केला आहे.