

Another person arrested in Yash Dhaka murder case
बीड, पुढारी वृत्तसेवा : येथील पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका खून प्रकरणात अन्य एकास पोलिसांनी गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेला परिसर असलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात गुरुवारी रात्री खुनाची घटना घडली.
खून करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये यश ढाका याला सुरज काटे सुरा भोसकत असताना दिसत आहे.
या प्रकरणात सुरज अप्पासाहेब काटे (रा. बीड) हा पोलिस कोठडीत आहे. यश ढाका हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. दरम्यान, या प्रकरणात अन्य तिघांची नावेही पुरवणी जबाबात नोंदविण्यात आली आहे. त्यांच्या सहभागाबाबत पोलिस तपास करत आहेत. याच दरम्यान, अन्य एकाला पोलिसांनी पाडळशिंगी येथून ताब्यात घेतले.
दरम्यान, ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ढाका कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, सुंदर वाघमारे, सूर्यकांत ठोकळ, वशीम शेख, राजेश वडमारे, समाधान बचुटे आदी सोबत होते. हा प्रकार सुनियोजित कट असून याचा सखोल तपास करून यातील अन्य आरोपींना तकाळ अटक करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.