Beed Crime News : फायनान्स कंपनीमधील कर्मचारी बनला दुचाकीचोर

चोरीच्या आठ दुचाकी जप्त; बीड शहर पोलिसांची कामगिरी
Beed Crime News
Beed Crime News : फायनान्स कंपनीमधील कर्मचारी बनला दुचाकीचोरFile Photo
Published on
Updated on

An employee of a finance company became a motorcycle thief

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोटरसायकल चोरीचे जाळे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या कारवाईत बीड शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून आठ (०८) चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे हा आरोपी यापूर्वी फायनान्स कंपनीत काम करत होता, तेथील कौशल्याचा वापर करुन नंतर दुचाकीचोर बनला होता.

Beed Crime News
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवर दगडफेक

सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर-ोपीचे नाव कृष्णा उमेश अंतरकर (वय २५ वर्षे, रा. शिवशक्ती नगर, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे आहे. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, सदर आरोपी यापूर्वी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. कामाच्या काळात हप्ते थकवलेल्या दुचाकी गाड्या ओढून आणण्याचे (रीपोझेशन) काम तो करीत होता. याच कामातून त्याला वाहन उचलण्याचे कौशल्य व सवय लागली. याच कौशल्याचा गैरवापर करून आरोपीने पुढे मोटरसायकल चोरी करण्यास सुरुवात केली. चोरी केलेल्या मोटरसायकली तो पाथर्डी परिसरात विक्रीस काढत असे. मी फायनान्स/बँकेत काम करतो, या गाड्या हप्ते थकित असल्याने ओढून आणलेल्या आहेत अशी खात्री देऊन आरोपी नागरिकांचा विश्वास संपादन करीत होता. फायनान्समध्ये काम करतो अशी ओळख असल्यामुळे नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सदर मोटरसायकली खरेदी केल्या.

बीड शहर पोलिसांच्या तपासात सदर मोटरसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या सर्व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे संबंधित खरेदीदारांना खरेदी केलेल्या मोटरसायकली गमवाव्या लागल्या तसेच त्या बदल्यात दिलेली रक्कमही गमवावी लागली अशा प्रकारे नागरिकांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले आहे.

Beed Crime News
Beed News : १४० गावच्या न्यायासाठी न्यायाचार्य उभे

मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा

लावण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या आठ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, पोलीस अंमलदार राम पवार, पोलीस अंमलदार इलियास शेख, मंगेश शिंदे, पोलीस अंमलदार शौकत शेख तसेच बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांचा विशेष सहभाग होता. यातून शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आले असून. आणखी गुन्ह्यातील सहभाग् सिद्ध आणि निश्चित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news