

Allegations in Baner land sale case for political motives
बीड, पुढारी वृत्तसेवा: बाणेर प्रकरणात जो काही निर्णय झालेला आहे तो २००६ मध्ये झालेला आहे. त्याची रजिस्ट्री व खरेदीखत २००९ मध्ये झालेली आहे. २०१३ मध्ये कायद्यात तरतूद होती ती जमिन वक्फ मंडळाच्या परवानगीने विकता येत होती. ती जमिन त्या कायद्याच्या नियमानुसार विक्री केलेली आहे. त्याच्यानंतर तो निर्णय चुकीचा आहे, याबाबत १६ वर्षात कोणीही, कोणत्याही न्यायालयात त्याला चॅलेंज केलेले नाही. तसेच कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. मात्र आज तो विषय काढला जात आहे तो केवळ माझ्याविरूब्द राजकारण म्हणून काढला जात आहे असे प्रतिउत्तर वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिले.
बीड येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत ना. समीर काझी बोलत होते. दि.५ ऑगस्ट रोजी वक्फ बोर्डाचा अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याबद्दल समीर काझी यांनी पत्रकार परिषदेत वर्षभरात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली. वक्फ मंडळात वर्षभरात केलेल्या सुधारणा, लोकउपयोगी निर्णय यामुळे मंडळाचे उत्पत्र अडीचपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ बोर्डाच्या डिजीटायलेशनचे काम प्रगतीपथावर असून शंभर ते दोनशे वर्षापुर्वीचे जिर्ण असलेले रेकॉर्ड स्कॅन करून जतन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरातील धोरणात्मक निर्णयामुळे वक्फ बोर्डाच्या कामामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे.
त्यामुळेच काही विघ्न संतोषी विरोधक राजकारण करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन करून वक्फ बोर्डाला वेठीस धरण्याचा कट देखील रचण्यात आल्याचे सांगून २४ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सुनावणीच्यावेळी देखील याच पध्दतीचे पडयंत्र रचण्यात आले होते असे त्यांनी सांगितले.
पंधरा दिवसापुर्वी गेवराईतील संजय नगर व इतर भागातील वक्फ जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना वक्फ अधिनियमानुसार रितसर भाडेकरू करून राज्य शासनाची घरकूल योजना मंजुर करण्यासाठी बैठक घेऊन प्रस्ताव मांडला. त्यावर वक्फ अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आ.अमरसिंह पंडित यांनी ही संकल्पना मांडल्याबद्दल समीर काझी यांनी त्यांचे कौतूक केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळेच वक्फ महामंडळाची परिस्थिती प्रचंड प्रमाणात सुधारल्याचे समीर काझी यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच बीड शहरामध्येही वक्फच्या मालत्तेवर लोकांना उपयोगी होईल असे काम करणार आहे. अल्संख्यांक मुलीसाठीचे वस्तीगृह उभारणीचा मानस असून वक्फच्या मालमत्तेवर सुसज्ज हॉस्पीटल उभारण्यात येणार असल्याचे ना. समीर काझी यांनी सांगितले. सध्या वक्फच्या मालमत्तांचे जिओ मॅपींगचे प्रयत्न सुरू आहे. मॅींगमध्ये प्रेस होणार्या वक्फ जमिनीवर व्यापारी संकुल उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. वक्फच्या मालमत्तेचा विकास झाल्यास मुस्लीम समाजाला कोणाच्याही दारात निधी मागण्यासाठी उभे राहण्याची गरज पडणार नाही असेही त्यांनी सांगितले.