बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांचे नाव

एका अधिकाऱ्याला घेतले ताब्यात; कारमध्ये पेटवला होता कोळसा
Beed Crime News
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांचे नावFile Photo
Published on
Updated on

A GST officer died under suspicious circumstances in Beed; Name of seniors in suicide note

बीड, पुढारी वृत्तसेवा :

बीड येथील जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या एका तरुण अधिकाऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन जाधवर (वय ३५) असे मयताचे नाव असून, शनिवारी (दि. १७) दुपारी सोलापूर-धुळे महामार्गालगत कपिलधार रोडवर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे, त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख असल्याने पोलिसांनी जीएसटी विभागातील एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

Beed Crime News
Parali News | धनगर आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे अटकेत: परळीत धनगर समाज आक्रमक; पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी !

सचिन जाधवर (मूळ रा. चुंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे बीड जीएसटी विभागात राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. मित्र आणि नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी कपिलधार रोडवरील एका निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि बाळराजे दराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

सचिन जाधवर हे केवळ अधिकारी नव्हते, तर एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. बी.एस्सी. (अॅग्री बायोटेक) आणि एम.ए. (इंग्रजी) शिक्षण घेतलेले जाधवर २०१२ मध्ये एमपीएससी परीक्षेतून एसटीआय म्हणून रुजू झाले होते. त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयावर पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे स्वतः चे यूट्यूब चॅनल असून, त्याद्वारे ते लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत.

Beed Crime News
Beed News : 'जगमित्र' प्रकरणी आ. मुंडेंच्या अडचणीत वाढ

विविध मार्गदर्शन केंद्रांवर ते विद्यार्थ्यांना शिकवत होते. अशा एका होतकरू आणि विद्वान अधिकाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जाधवर यांनी यापूर्वीही वरिष्ठांच्या त्रासाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, ज्या अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे, त्याची बदली जालना येथे झाली असतानाही तो बीडमध्ये कसा कार्यरत होता? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

कारमध्ये आढळले मडके आणि कोळसा जाधवर यांची कार आतून लॉक करण्यात आलेली होती. पोलिसांना कारमध्ये एक मडके (गाडगे) आणि त्यात पेटवलेला कोळसा आढळून आला. कारच्या खिडक्या बंद करून कोळसा पेटवल्याने आतमध्ये धूर झाला असावा आणि ऑक्सिजन न मिळाल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news