बीड : गेवराईत एका व्यक्तीचा मृत्तदेह सापडल्याने खळबळ

file photo
file photo

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : शहरातील चिंतेश्वर मंदिरासमोर असलेल्या खंडोबा मंदिर परिसरात रविवार (दि. २४) रोजी सकाळी सातच्या सुमारास एका व्यक्तीचा मृत्तदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर इसमाची ओळख पटली असून तो हदगाव ( ता. अंबड, जिल्हा. जालना) येथील आहे.

या इसमाचा मृत्तदेह  पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून ओळखीबाबत माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन गेवराई पोलिसांनी केलं आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news