बीड : केजमध्ये आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आणखी एका तरूणाला अटक

बीड :  केजमध्ये आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आणखी एका तरूणाला अटक

केज; पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असून याप्रकरणी केज पोलिसांनी कठोर पावले उचलले आहेत. आणखी एक आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बुधवारी (दि.१२) पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कृष्णा बळीराम साखरे असे या संशयिताचे नाव आहे.

सोशल मीडियावर सामाजिक शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. मागील काही दिवसात केज तालुक्यात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. दरम्यान अशाच प्रकारे एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शेलगाव गांजी (ता. केज) येथील कृष्णा साखरे या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गु रं. नं . १४९/२०२४ भादवी २९४, ५०५ (२) यासह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ अन्वये कारवाई केली आहे.  संशयित आरोपी साखरे याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ जूनपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news