

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : शहरातील एचडीएफसी बँकेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. सोमनाथ राम लेंडगुळे (वय 37, रा. छ. संभाजीनगर) असे मृत शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. ही घटना आज (दि.३१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोर घडली. Beed Accident News
याबाबत अधिक माहिती अशी की, लेंडगुळे हे गेवराई शहरातील एचडीएफसी बँकेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. मार्च एन्ड असल्यामुळे ते आज सुट्टी असतानाही बँकेचे दिवसभर कामकाज करत होते. सायंकाळी ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून (एम एच 20 सी झेड 1896) घरी जात असताना त्यांचा तोल जाऊन गाडीसह महामार्गावर कोसळले. यावेळी ट्रकचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. Beed Accident News
गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर नागरिक व नातेवाईकांनी गर्दी केली होती. दरम्यान त्यांच्या पत्नीचा रविवारी वाढदिवस होता. पत्नीच्या वाढदिवसाची पोस्ट त्यांनी सकाळी आपल्या मोबाईलवर ठेवली होती. दरम्यान, गेवराई पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
हेही वाचा