बीडमध्ये भाजपाला धक्का: ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांचा शरद पवार गटात प्रवेश

फुलचंद कराड
फुलचंद कराड
Published on
Updated on

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीवर अनेक वर्ष काम केलेले भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फुलचंद कराड यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजपा नेत्यांने शरद पवार गटात प्रवेश केल्याने बीडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.

संबंधित बातम्या 

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत निकटचे सहकारी म्हणून अनेक वर्ष फुलचंद कराड यांनी काम केलेले आहे. त्याचबरोबर भाजपाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केलेले आहे. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व संचालक म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता.

परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यानंतर परत ते भाजपात आले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. नरेंद्र पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news