बीड: खोकरमोह येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले | पुढारी

बीड: खोकरमोह येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले

शिरूर: पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील खोकरमोह परिसरामध्ये आज (दि.२९) दुपारी 3. 30 च्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह हलकसा पाऊस झाला. यात एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने घराचे मोठे नुकसान झाले. आज ढगाळ वातावरण असल्याने उष्णता चांगलीच वाढली होती. दरम्यान, वादळी वाऱ्यासह हलक्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता,

शेतकरी भगवान नाना मिसाळ या शेतकऱ्याचे खोकमोह – खालापुरी रस्त्यालगत असलेल्या शेतातील राहत्या घरावरी पत्रे उडाल्याने या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. याबाबत नायब तहसीलदार शिवनाथ खेडकर यांनी पंचनामा केला जाईल, असे सांगितले.

फुलसांगवी परिसरात रिमझिम पाऊस

मागील दोन दिवसांत तालुक्यातील नांदेवली, राळेसांगवी, निमगाव मायंबा, तिंतरवणी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता.  त्यानंतर आज फुलसांगवी परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सातनंतर रिमझिम पावस झाला. त्यामुळे उष्ण वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा 

Back to top button