बीड : आष्टीत माजी आमदार यांच्या कार्यक्रमात मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ | पुढारी

बीड : आष्टीत माजी आमदार यांच्या कार्यक्रमात मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या कार्यक्रमात मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तालुक्यातील चोभानिमगाव येथे कानिफनाथ विद्यालयात ‘गाव चलो अभियान’ या कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, अशा घोषणा देत मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत गावात कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम होऊ देणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे. चोभानीमगाव येथे माजी आमदार भिमराव धोंडे यांनी कानिफनाथ विद्यालयामध्ये ‘गाव चलो अभियान’ हा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमावेळी अचानक पन्नास ते साठ मराठा कार्यकर्ते घोषणाबाजी करीत आले. व शाळेतील कार्यक्रमात पक्षाचे बॅनर का? असा सवाल करत कार्यक्रमस्थळी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले.

हेही वाचा : 

Back to top button