Beed News: माजलगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून ग्रामसेवकाने जीवन संपविले | पुढारी

Beed News: माजलगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून ग्रामसेवकाने जीवन संपविले

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या माजलगाव पंचायत समितीचे लोणगाव येथील ग्रामसेवक रवींद्र सर्जेराव पवार (वय ३५) यांनी ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारी यांच्या जाचास कंटाळून आज (दि.२१) जीवन संपवले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. Beed News

माजलगाव पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांची आयोजित केलेली मीटिंग संपल्यानंतर आज दुपारी ३ च्या सुमारास माजलगाव शहरालगत असलेल्या भाटवडगाव वसाहतीमध्ये राहत असलेल्या घरामध्ये पवार यांनी जीवन संपवले. Beed News

दोन महिन्यांपूर्वी कोकण विभागातून माजलगाव पंचायत समितीला बदलून आलेले ग्रामसेवक रवींद्र सर्जेराव पवार (वय ३५) माजलगाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या लोणगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. तेथील बेकायदेशीर कामासाठी तेथील आजी-माजी पदाधिकारी ग्रामसेवक पवार यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप मृत ग्रामसेवकांच्या नातेवाईकांनी केला आहे. बेकायदेशीर कामे करण्यासाठी सततच्या दबाव धमक्यांना व्यतीत होऊन पवार यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

Beed News  : दोन वर्षांपूर्वी एका ग्रामसेवकाने जीवन संपविले होते.

ताणतणावातून माजलगाव तालुक्यातील काळेगाव थडी येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक अशोक फटिंग यांनी जीवन संपविले होते.

हेही वाचा 

Back to top button