बीड: घाटसावळी येथे मराठा समाज भर उन्हात रस्त्यावर | पुढारी

बीड: घाटसावळी येथे मराठा समाज भर उन्हात रस्त्यावर

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा: बीड तालुक्यातील पिंपळनेर बाजारपेठ आज (दि.१७) कडकडीत बंद ठेवून मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला. यावेळी परिसरातून महिला, आबालवृद्ध व मराठा समाज मोठ्या संख्येने भर उन्हात रस्त्यावर उतरला होता. यावेळी रास्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी हजारो मराठा बांधवांसह महिला उपस्थित होत्या. या आंदोलनावेळी बीड-परळी महामार्गावर घाटसावळी येथे अडीच ते तीन तास चक्का जाम झाला होता. यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी पिंपळनेर पोलिस स्टेशनचे सपोनि मधुसूदन घुगे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा 

Back to top button