बीड : गेवराई येथे विद्युत तारेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू | पुढारी

बीड : गेवराई येथे विद्युत तारेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : भंगारची गाडी भरताना विद्युत खांबावरील तारेला अचानक हात लागल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. गेवराई येथील मोंढा नाका परिसरात आज (दि.६) सायंकाळी ही घटना घडली. मोमिन नय्युम (वय ४५) असे या कामगाराचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गेवराई शहरातील मोंढा परिसरात मोमिन नय्युम व शेख रीजवान हे दोघे एका भंगार दुकानावर काम करीत होते. यावेळी भंगाराची गाडी भरताना दोघांनाही विद्युत तारेचा जोराचा झटका बसला. यामध्ये मोमीन नय्युम यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख रीजवान हे गंभीर जखमी झाले. शेख यांना पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button