

बीड; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथील मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणास १५ दिवस होत आहेत. आरक्षणाचा तोडगा निघाला नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपळनेर सर्कल येथून हजारो मराठा बांधव मोटारसायकल रॅली काढून अंतरवली सराटेच्या दिशेने रवाना झाले आहेत.
यामध्ये बीड तालुक्यातील पिंपळनेर सह नाथापुर, लोणी, सांडरवन, लिंबारुई देवी सुर्डी पिंपळादेवी, बेलवाडी, बेडूकवाडी आदी गावच्या तरुणांनी पिंपळनेर येथून रॅलीचे नियोजन करून आरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा :