बीड : धारूर मध्ये आक्षेपार्ह माेबाईल स्‍टेटसवरून तणाव

बीड : धारूर मध्ये आक्षेपार्ह माेबाईल स्‍टेटसवरून तणाव
Published on
Updated on

धारूर, पुढारी वृत्तसेवा धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील आडस येथे शनिवार (5 ऑगस्ट) रोजी संध्याकाळी एकाने आपल्या मोबाईलवर औरंगजेबचा फोटो त्‍यावर किंग व खाली मजकूर लिहिल्‍याचा प्रकार घडला. यामुळे एका गटाच्या भावना दुखावल्या प्रकरणी दोन गटामध्ये वाद झाला. यावेळी एकमेकांवर दगड फेकण्याचा प्रकार आडस येथे घडला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद आटोक्यात आणला. या वादात तीनजण जखमी झाले. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत मस्के यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील 25 ते 30 जणांवर धारूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी 14 युवकांना अटक करण्यात आली आहे.

धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील आडस येथे (5 ऑगस्ट) रोजी गावातील एका व्यक्‍तीने आपल्या मोबाईलवर औरंगजेबचा फोटो व त्यावर किंग व खाली मजकूर लिहून स्टेटस ठेवला. गावातील युवकांनी हा स्टेटस पाहून संबंधीताच्या घरी जाऊन या विषयी जाब विचारत त्‍याला हाणमार केली. एका गटाकडून त्‍या व्यक्‍तीला चौकात आणण्यात आले. त्यावेळी त्या ठिकाणी दुसर्‍या गटाचे युवक जमा झाले. मुख्य चौकात आल्यानंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला व एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल प्रशांत मस्के यांनी धारूर पोलीस स्टेशनमध्ये याची खबर दिली.

पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी तात्काळ आडस येथे येऊन दोन गटातील वाद आटोक्यात आणला. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आडस येथे येऊन नागरिकांना शांततेचे आव्हान केल्यानंतर तेथील वाद आटोक्यात आला. या दगडफेकीमध्ये काही युवक जखमी झाले. त्यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालया उपचारासाठी दाखल केले. धारूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल प्रशांत मस्के यांच्या फिर्यादीवरून आक्षेपार्ह मजकुर स्टेटसला ठेवल्‍या प्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांचे जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्‍या प्रकरणी आडस येथील दोन्ही गटातील 25 ते 30 जणांवर हेड कॉन्स्टेबल प्रशांत मस्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्‍यान मजकूर स्टेटसला ठेवणारी व्यक्‍ती फरार झाली असून, इतर 14 युवकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news