बीड : माजलगावात आयशर वाहन चालकाला पावणे तीन लाखांना लुटले

बीड : माजलगावात आयशर वाहन चालकाला पावणे तीन लाखांना लुटले

माजलगाव, पुढारी पृत्‍तसेवा : बीड जिल्‍हातील केसापूरी येथे अज्ञातानी आयशर वाहन चालकाला अडवले. त्‍यानंतर त्याला कोयता, चाकुचा धाक दाखवत मारहाण करून त्याच्याजवळील 2 लाख 50 हजार रूपये आणि मोबाईल असे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लुटला. ही घटना रात्री घडली असून याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शेख अख्तर, शेख पाशा (वय 32, चालक, रा.किल्लावेस, कमवाडा बीड) हा माजलगाव ते परतूर रोडवर केसापुरी गावाजवळ आयशर क्र. एम.एच.43 वाय 2584 घेवून जात होते. यावेळी केसापुरी गावाजवळ त्यांच्या गाडीला पल्सर दुचाकीवरून तीन अज्ञातांनी अडवले. यावेळी हातामध्ये रॉड, चाकु व कोयत्याने शेख अख्तर आणि त्यांच्या साथीदाराला मारहाण केली. त्‍यानंतर त्यांच्याकडील 2 लाख 50 हजार व दोन रेडमी कंपनीचे मोबाईल असा एकूण 2 लाख 60 हजाराचा मुद्देमाल लुटून पोबारा केला.

दरम्‍यान, जखमी चालक शेख अख्तर यांनी घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी तात्‍काळ भेट दिली. शेख अख्तर यांच्या फिर्यादीवरून तिघाविरूदध माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 394, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक झोनवाल हे करत आहेत.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news