नाशिक : तरुणीला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करणाऱ्यास अटक | पुढारी

नाशिक : तरुणीला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करणाऱ्यास अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; तरुणीला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ राजू सोनवणे (१९, रा. अंबड लिंकरोड) असे या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, ती सोमवारी (दि. १४) सायंकाळी सातच्या सुमारास उंटवाडी परिसरातून पायी जात होती.

त्यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्यातून संशयित सौरभ तिच्याजवळ आला व त्याने विनयभंग केला. पीडितेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सौरभविरोधात घरफोडीचे तीन गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :

Back to top button