Pankaja Munde v/s BJP : बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा रोखला
बीड : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलल्यामुळे मुंडे समर्थक कमालीचे संतप्त झाले आहेत. आज (दि.१२) विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे बीडमध्ये आले असता पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकरांचा ताफा अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न (Pankaja Munde v/s BJP) केला. यावेळी पोलिसांनी मुंडे समर्थकांना बाजूला काढले.
(Pankaja Munde v/s BJP) आमदार विनायक मेटे यांनी आज बीड येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर बीडला आले होते. कार्यक्रम आटोपून दरेकर जात असताना पंकजा मुंडे समर्थकांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांनी मुंडे समर्थकांना बाजूला केले. राज्यभरात लाखो समर्थक असतानाही मुंडे भगिनींना भाजप वारंवार डावलत आहे. यामुळे मंडे समर्थक कमालीचे अस्वस्थ आहेत. वेगवेगळ्या मार्गाने ते रोष व्यक्त करत आहेत.
हेही वाचलंत का ?
- Rakhi Sawant : राखी सावंत पाेलीस ठाण्यातच ओक्साबोक्सी रडली, माजी पतीवर केले गंभीर आराेप
- शब्द पाळला ! १९५० ला होळकरांनी दिलेली 'ती' ऐतिहासिक जागा त्यांच्या कुटुंबियांना परत करणार; शरद पवारांची मोठी घोषणा!
- Tridha Choudhury : 'आश्रम'च्या बबीताने स्विमिंगपूलमध्ये लावली आग, बॉबी म्हणायला लागला 'जप नाम' 'जप नाम'!

