

धारूर (बीड), पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण केले आहे. 28 पैकी 18 ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे तर 8 ग्रामपंचायती भाजपकडे आल्या आहेत तर काँग्रेस- संमिश्र 1/1आहे. सरपंच पदामध्ये14 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे.
धारूर तालुक्यातील 31 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम पहिल्या टप्प्यात जाहीर झाला होता. त्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध आल्या होत्या. तालुक्यात एकतीस ग्रामपंचायतच्या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये झाल्या यामधील तीन ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड झाली होती. तर 28 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाली.
28 ग्रामपंचायती पैकी 18 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्मान केले आहे. तर भाजपाकडे आठ ग्रामपंचायत वर्चस्व आहे. काँग्रेसकडे एक ग्रामपंचायत गेली आहे. तालुक्यात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतीवर निर्माण झालेले आहे .भाजपच्या बालेकिल्लातील ग्रामपंचायती ही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडे गेल्या आहेत.
आडसकर यांचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायती काही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या आहेत. तालुक्यातील कोळपिंपरी, अंजनडोह या ग्रामपंचायती राष्टवादीकडे गेल्या आहेत. तर आसरडोह भाजपाकडेच राहीली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ईश्वर मुंडे यांच्याकडे गांजपूर ग्रामपंचायत आली आहे. रमेश आडसकर यांचे समर्थक कोळपिंपरीचे विजयकुमार खुळे यांचे सर्व सदस्य निवडून आले.
बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे यांच्या गावातील त्यांचे ग्रामपंचायत निवडनुकीत वर्चस्व संपुष्टात आले आहे . तेलगाव येथील ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. देवठाणा येथे भागवत दराडे यांनी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष यांच्या ताब्यातून आसोला ग्रामपंचायत निसटली आहे. मुंबई येथून येवून राजश्री नामदेव मुंडे चोंडी येथे सरपंच झाल्या आहेत .
कोळपिंपरी ग्रामपंचायत निवडणुकीत नऊपैकी नऊ सदस्य भाजपच्या ताब्यात तर सरपंच राष्ट्रवादीचा. गाजपुर मध्ये ग्रामपंचायत सदस्य बहुमताने भाजचे तर सरपंच राष्ट्रवादीचा पांगरी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराचे जेसीबी चिन्ह असल्याने निकालानंतर जेसीबीमधून मिरवणूक काढली.
राष्ट्रवादी – 18. भाजप – 08. समिश्र -01
कॉंग्रेस – 01
पांगरी – सुनीता डोरले – राष्ट्रवादी .
खोडस- समाधान लाखे – भाजप .
कोळपिंपरी- आशोक यादव – राष्ट्रवादी .
चिंचपूर- विजयमाला समुद्रे -राष्ट्रवादी .
आवरगाव – अमोल जगताप – राष्ट्रवादी .
वाघोली – सोजरबाई गायकवाड -भाजप
गांजपूर – कस्तूरा पवार – राष्ट्रवादी .
अंजनडोह – उषा सोळंक – राष्ट्रवादी .
तांदळवाडी – पंडीत साखर – राष्ट्रवादी .
आसरडोह – मंगल देशमुख – भाजप .
आसोला – महादेव चोले – राष्ट्रवादी .
उमरेवाडी – गौतम दहीफळे – भाजप .
चोंडी – राजश्री मुंडे – समिश्र
आंबेवडगाव – उत्रेश्वर घोळवे – राष्ट्रवादी .
गावंदरा – आविद्या सौंदरमल -भाजप .
बोडखा – आशोक तिडके – कॉग्रेस .
कारी – भाग्यश्री दिपक मोरे – राष्ट्रवादी .
चोरांबा – सुभाष साक्रुडकर – राष्ट्रवादी .
प . दहीफळ – शारदा नांदे – राष्ट्रवादी .
अरणवाडी – सुशीला शिनगारे – राष्ट्रवादी .
देवदहीफळ – स्मिता बडे – भाजप
चाटगाव -मंडाबाई केकान -भाजप
संगम- भगवान कांदे -भाजपा
आमला निमला -अंकुश सोळुंके- राष्ट्रवादी
ज्योती सचिन सोळंके -मुगीं -राष्ट्रवादी
छाया चौरे- देवठाणा- राष्ट्रवादी
फकीर जवळा -त्रिंबक साबळे -राष्ट्रवादी
तेलगाव -कावेरी धुमाळ -राष्ट्रवादी
.हेही वाचा