बीड : केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सैन्य दलातील जवान उमेश मिसाळ शहीद

जवान उमेश मिसाळ शहीद
जवान उमेश मिसाळ शहीद

केज ; पुढारी वृत्‍तसेवा केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना २६ जून रोजी ते शहीद झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन मध्ये सुरतगढ येथे सेवा बजावत होते. त्यांचे दि. २६ जून रोजी सकाळी निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते दोनच वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. केवळ सहा महिन्या पूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश यांचे पार्थिव घेऊन आज दि. २७ जून रोजी रात्री ११:०० नंतर दिल्ली येथून विमानाने पुणे येथे येणार आहेत. त्या नंतर ते २८ जून रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत त्यांच्या मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे पोहोचेल. त्या नंतर शहीद जवान उमेश मिसाळ यांचा अंत्यविधी हा संपूर्ण शासकीय इतमामात पार पडणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news