बीड : नागापूर धरणात पोहायला गेलेला युवक बुडाला

बीड : नागापूर धरणात पोहायला गेलेला युवक बुडाला

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणात पोहायला गेलेल्या एक युवक धरणात बुडाला. शेख तालेब शेख जानी (वय 24, रा. जुना रेल्वे स्टेशन, परळी ) असे या युवकाचे नाव आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील जुना रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी असलेला शेख तालेब शेख हा नागापुर वाण धरणात पोहायला गेला होता. यावेळी तो बुडाला. याची माहिती मिळताच घटनास्थळी परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, नगरपालिकेचे आपत्कालीन पथक, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाले. या तरुणाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच परळीचा मुख्य जलस्त्रोत असलेला नागापूरचा वाहन प्रकल्प तुडुंब भरला आहे. हा प्रकल्प सेल्फी पॉईंट बनला आहे. धरणात पोहायला जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news