बीड: भाविकांच्या वाहनाला बसची धडक; २ महिला ठार, २३ जण जखमी

बीड: भाविकांच्या वाहनाला बसची धडक; २ महिला ठार, २३ जण जखमी

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर महामार्गावरील उदंडवडगाव येथील शिवाजीनगर भागात जालना- पंढरपूर या बसने परभणी येथून मांढरदेवीकडे चाललेल्या पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये 11 लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना रविवारी रात्री 1 वाजता घडली.

परभणी येथील भाविक पिकअपमधून (एमएच 25 पी 5146) मांढरदेवीकडे चालले होते. रविवारी रात्री एक वाजता मांजरसुंबाजवळ उदंड वडगावच्या शिवाजीनगर भागात अंबड आगाराच्या बसने (एमएच 06 एस 8545) पिकअपला जोराची धडक दिली. यात पिकअपमधील मथुराबाई पांडुरंग गवाले (वय 70, रा. आंबेडकर नगर, परभणी) रंगुबाई साहेबराव जाधव (वय 55, रा. पंचशीलनगर, परभणी) यांचा मृत्यू झाला. तर 23 जण यामध्ये जखमी असून यामध्ये 11 लहान मुलांचा समावेश आहे.

अपघातस्थळी कुठलेच दिशादर्शक फलक नसल्याने वाहने वळतात आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनाची धडक बसून अपघात घडतात. अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास एपीआय विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय पानपाटील, सचिन डिडोळ करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news