बीड : किरकोळ भांडणातून धारूरमध्ये बियर बार समोर तरुणाचा खून | पुढारी

बीड : किरकोळ भांडणातून धारूरमध्ये बियर बार समोर तरुणाचा खून

धारूर, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाचा खून झाल्याची घटना धारूर येथील तेलगाव रोड येथील विजय बिअर बार येथे रविवारी (दि.२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
धारूर येथील तेलगाव रोड लगत विजय बियर बार आहे. या ठिकाणी धारूर येथील नितीन मोहन धोत्रे (वय ४०) व इतर काही जणांमध्ये रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास भांडण झाले होत. या भांडणांमध्ये नितीन धोत्रे या तरुणाचा डोक्यात मार लागल्याने जागीच खून झाल्याची घटना घडली.

भर रस्त्यावर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे धारूर शहरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पहाणी केली. नितीन धोत्रे यांचे धारूर शहरात सराफा दुकान आहे. या प्रकरणांमध्ये नातेवाईकांनी पोलीसात धाव घेवून आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती . खुनाबद्दल मात्र नेमके कारण समजू शकले नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button