छत्रपती संभाजीनगर : गंगापूर-वैजापूर रोडवर अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर-वैजापूर रोडवर अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला
Published on
Updated on

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या मुलीचा घातपात, अपघात की उष्माघात झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ माऊली शिवारात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनी कल्याणी अशोक लांडे (वय१७) ही महाराष्ट्र भूषण शाळेमध्ये १२वीच्या वर्गात शिकत होती. २४ मे रोजी सकाळी शहरातील एका कोचिंग क्लासेसला शिकवणी करुन घरी येणार होती. परंतु, दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान घरापासून दोन किलोमीटर अंतरावरील गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला.

तिच्या जवळ स्कुल बॅग असल्याची माहिती मिळताच गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह ताब्यात घेत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मुलीचा मृत्यू कशामुळे झाला? याविषयी माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा घातपात, अपघात की उष्माघात झाला हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होईल. पुढील तपास पोलीस करत आहेत. उपजिल्हा रुग्णालय व पोलिस स्टेशनमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news