आरटीओकडून एका दिवसात 622 जणांवर धडक कारवाई, 73 आरटीओ अधिकाऱ्यांची कारवाईसाठी नेमणूक

आरटीओकडून एका दिवसात 622 जणांवर धडक कारवाई, 73 आरटीओ अधिकाऱ्यांची कारवाईसाठी नेमणूक
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिल्यानंतर आरटीओकडून बुधवारी 622 जणांवर विना हेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे. याकरता पुणे आरटीओने शहरातील विविध सरकारी कार्यालयात आपल्या 73 अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती.

पणे शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि मोटर वाहन कायद्यातील नियमांचे पालन होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे शहर वाहतूक पोलिसांना आणि आरटीओ प्रशासनाला शहरातील सरकारी कार्यालयात हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे आरटीओने बुधवारी एका दिवसात 622 सरकारी कर्मचारी आणि वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

या कारवाईसाठी पुणे आरटीओने 44 सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, 25 मोटर वाहन निरीक्षक आणि चार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची नेमणूक केली होती. या एकूण 73 जणांच्या पथकाने पुणे शहरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन हेल्मेट परिधान न करणारे सरकारी कर्मचारी आणि वाहन चालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news