औरंगाबाद : शांतता, राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून विशेष प्रार्थना

औरंगाबाद : शांतता, राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून विशेष प्रार्थना

अजिंठा : पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्ताने जामा मस्जिद, बिलाल मस्जिद, मदर साहाब मस्जिद, आणि ईदगाह मैदान येथे मंगळवारी सकाळी मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करत देशात एकता व अखंडता टिकून रहावी; यासाठी प्रार्थना केली. मागील दोन वर्ष कोरोना काळातील निर्बंधानंतर आज नमाज अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले होते.

यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त एकमेकांना शुभेछा दिल्या. तसेच हिंदू व मुस्लिम बांधवांमधील एकता व अखंडता टिकून रहावी, यासाठी प्रार्थना केली. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना राजेश खन्ना, प्रविण बिरारे, भास्कर बिरारे, व अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिंत विसपुते, पोलीस कर्मचारी आदींना ईद मुबारक म्हणत गळेभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये चिमुकल्यांचादेखील सहभाग असल्याचे दिसून आले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news