पुढारी ऑनलाईन डेस्क : "कायदा व सुव्यवस्था हातळण्यास पोलीस सक्षम आहेत. समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यात त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राज्याने शांतता पाळण्यात यावी", असे आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले आहे.
गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालक रजनीश सेठ बोलत होते. ते म्हणाले की, "राज्यात एकोपी जपला पाहिजे. गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतलेली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केलेला आहे. आवश्यकता वाटल्यास आजच राज ठाकरेंवर पोलीस कारवाई करतील. कोणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल", अशीही माहिती पोलीस महासंचालक यांनी दिली आहे.
"पोलिसांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत. ३० हजारांहून अधिक होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. आम्ही सर्व समाजाच्या प्रमुखांच्या बैठकी घेतला आहे आणि त्यांच्याकडून सहकार्य करण्यात येत आहे. गृहमंत्री राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. मनसेच्या बाळ नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे ", अशीही माहिती त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.