औरंगाबाद : पैठण बाजार समितीच्या सभापती पदी राजू भुमरे तर उपसभापती पदी राम एरंडे

औरंगाबाद : पैठण बाजार समितीच्या सभापती पदी राजू भुमरे तर उपसभापती पदी राम एरंडे

Published on

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे बंधू राजू नाना भुमरे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर उपसभापतीपदी ज्येष्ठ संचालक राम पा. एरंडे यांची निवड झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून विलास बापू भुमरे यांनी संचालक पदाच्या निवडणुकीत शिवशाही पॅनलचे सर्व १८ उमेदवारांचा एकतर्फी दणदणीत विजय मिळवून सर्वपक्षीय आघाडीच्या पॅनलचा धुवा उडविला होता. पालकमंत्री भुमरे यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुन्हा एकदा सभापती होणार व उपसभापती पदासाठी ज्येष्ठ संचालक राम पाटील एरंडे यांची निवड करण्यात येईल, असे भाकीत दैनिक पुढारी मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. आज (दि.२२) निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अनिल पुरी, बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती, उपसभापती निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली आहे. यामध्ये सभापती पदासाठी राजू भुमरे यांचा तर उपसभापती पदासाठी राम पाटील एरंडे यांचा अर्ज दाखल केल्यामुळे सदरील निवड बिनविरोध पार पडली. निवड घोषित होताच पालकमंत्री भुमरे यांच्या संपर्क कार्यालय परिसरात शिवसैनिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला. याप्रसंगी राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथमंदिर कार्यकारी विश्वस्त दादा पाटील, बारे विनोद बोंबले, अण्णासाहेब लबडे, रवींद्र काळे, रवींद्र सिसोदे, उप तालुका प्रमुख राजेंद्र मापारी, शेखर शिंदे, शहादेव लोहारे, अमोल जाधव, संतोष बाठे, नामदेव खरात, अमोल एरंडे, शौकत पठाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news