हिंगोलीत घरामध्ये लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरने घेतला पेट

हिंगोलीत घरामध्ये लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरने घेतला पेट
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली शहरातील आझम कॉलनी भागात इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतल्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शनिवारी (दि.२२) पहाटे ही घटना घडली.

शहरातील आझम कॉलनी भागामध्ये शेख अफरोज शेख हबीब यांचे घर आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. नेहमीप्रमाणे आज पहाटे चार वाजता त्यांनी घरामध्ये स्कूटर चार्जिंगला लावली होती. सात वाजता चार्जिंगची वायर काढल्यानंतर शेख अफरोज हे घरात काम करत होते. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच घरात अचानक धूर झाला. स्कूटीची बॅटरी पेटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घरात झोपलेल्या मुलांना बाहेर काढले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घरातील सर्वजण घाबरून गेले. घरामध्ये आग व धुर पसरला होता. शेख अफरोज व शेजाऱ्यांनी आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर स्कूटर ओढून घराच्या बाहेर काढण्यात आली. स्कूटर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास पाटील, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news