हिंगोली : वसमत येथे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात निदर्शने

हिंगोली : वसमत येथे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात निदर्शने
Published on
Updated on

वसमत; पुढारी वृत्तसेवा : खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात वसमत येथील गवळी मारुती मंदिर परिसरात निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्यावतीने अब्दुल सत्तार यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळीआमदार राजू नवघरे यांनी सत्तार यांनी केलेल्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांबाबत असे व्यक्तव्य सहन केले जाणार नाही. सत्तेचा माज असलेल्या मंत्र्यांना महिलांच्या बाबतीत काय बोलायचे याचे भान राहीलेले नाही, असे ते म्हणाले.

यावेळी शहराध्यक्ष आयुब पठाण, पॉप्युलर विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागल, तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम, तानाजी बेंडे, बाळूमामा ढोरे, जिजामामा हरणे, मुनिता जाधव, रत्नमाला शिंदे, सौरभ जाधव, दौलत हुंबाड, मनोज भालेराव, गजानन सवंडकर, गणेश कमळू, हबीबभाई तांबट, सचिन दगडू, गजानन जाधव, नितीन जोगदंड, शुभम शिंदे, शंकर मामा इंगोले, सूर्यभान फेगडे, मुंजाजी दळवी, चंद्रकांत दळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news