बेळगाव : पोलिस ठाण्यासमोर मुलीचा मृतदेह ठेवून निदर्शने; खुनाचा आरोप | पुढारी

बेळगाव : पोलिस ठाण्यासमोर मुलीचा मृतदेह ठेवून निदर्शने; खुनाचा आरोप

जमखंडी;पुढारी वृत्तसेवा :  मुलीचा अपघाती मृत्यू नसून तिचा खून झाला असल्याचा आरोप करून पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून पालक व परिसरातील नागरिकांनी निदर्शने केली.जमखंडी ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर ही घटना घडली.

येथील चौडय्यानगरमधील कुस्तीपटू वाणी संगाप्पा जगदाळ (वय 19) या तरुणीला एका व्यक्तीने आपल्या मुलीला कुस्तीचे प्रशिक्षण देण्याच्या आमिषाने नेऊन कुंचनूर रस्त्याजवळ तिचा खून केला, अशी तक्रार मुलीचे वडील संगाप्पा जगदाळ याने केली. पोलिसांनी तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. त्यामुळे चौडय्यानगर परिसरातील संतप्त नागरिकांनी मुलीचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवून निदर्शने केली. सीपीआय चव्हाण यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button