कोरोना : राज्यांच्या निर्बंधात समानता आणा : आरोग्यमंत्री राजेश टोपे | पुढारी

कोरोना : राज्यांच्या निर्बंधात समानता आणा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी आपापल्या पद्धतीने निर्बंध लावले आहेत. सर्व राज्यांनी निर्बंधात समानता आणण्यासाठी केंद्राने मार्गदर्शन करावे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले. टोपे यांनी आज जालन्यात मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ केला.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लागू केले जात आहेत. महाराष्ट्रात उपलब्ध ऑक्सिजन आणि रुग्णालयातील बेड्सची संख्या यावरून निर्बंध ठरवण्यात येतील. लॉकडावून लावण्याची वेळच येणार नाही अशीच शासनाची भूमिका आहे. सध्या हरियाणात, दिल्लीत निर्बंध आहेत. प्रत्येक राज्य वेगळ्या पद्धतीने निर्बंध लागू करत आहेत.

आयसीएमआर वगैरे संस्था आहेत. त्यांनी सर्व राज्यांना समान निर्बंध लागू करण्याबाबत मार्गदर्शन करायला हवे असे ते म्हणाले. केंद्र सरकारने दिलेल्या निकषानुसार मुलांची लसीकरण राज्यात केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button