नांदेड: फी जमा केली नसल्याने ८५० विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेला मुकले

नांदेड: फी जमा केली नसल्याने ८५० विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेला मुकले

लोहा; पुढारी वृत्तसेवा : लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयातर्गंत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी विद्यापीठात भरली नसल्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या प्रकारामुळे महाविद्यालयांमध्ये एकच गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांनी लोहा पोलिसांत तक्रार दिली आहे.

श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयातील केंद्रावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. चालू वर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्याकडून परीक्षा फी २ हजार रुपये प्रमाणे भरून घेण्यात आली. पण विद्यापीठात फी जमा करण्यात आली नसल्याचा प्रकार आज परीक्षेच्या दिवशी समोर आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

सुमारे ८५० विद्यार्थ्यांना आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्य यांच्याकडे याबाबत विचारणा केली. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुक्त विद्यापीठातील परीक्षेचे कामकाज पाहणारे ए.के. भंडारे मागील आठ दिवसांपासून महाविद्यालयात गैरहजर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे.

महाविद्यालयातील परीक्षा प्रमुख भंडारी यांच्याकडे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरली आहे. याची खात्री करून त्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोंबर २०२३ मध्ये घेण्यात येईल.

– प्राचार्य अशोक गवते (श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news