जालना: जोगलादेवी येथे घरफोडी; साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

जालना: जोगलादेवी येथे घरफोडी; साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

तीर्थपुरी, पुढारी वृत्तसेवा:  घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून नगदी दोन लाख रुपये व साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.

फोटोग्राफरचा व्यवसाय करणारे प्रसाद श्रीकिसन खोजे व त्यांचे आईवडील रात्री ९ वाजता जेवण करून घराच्या छतावर झोपायला गेले होते. पहाटे ४ वाजता आई शोभाबाई खाली आल्या असता त्यांना किचनरुममध्ये लोखंडी संदूक व इतर सामान इतरत्र विस्कटल्याचे दिसले. त्यांनी  घरात चोरी झाल्याचे दिसून येताच शोभाबाई यांनी आरडाओरड केल्यावर मुलगा व पती खाली आले. त्यांनी  शेजारी पाजऱ्यांना उठवले, पोलीस पाटील भुजंगराव खोजे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी  श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news