छ. संभाजीनगर: पैठण येथे रूग्णालयात गळफास घेऊन रुग्णाने जीवन संपविले

छ. संभाजीनगर: पैठण येथे रूग्णालयात गळफास घेऊन रुग्णाने जीवन संपविले

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण शहरातील नवीन कावसान भागातील खासगी रुग्णालयात एका ३७ वर्षीय रुग्णाने गळफास घेऊन आज (दि.१७) जीवन संपविले. विठ्ठल रामराव देशमुख (रा. मुंगी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे मृत रुग्णाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खासगी रूग्णालयात विठ्ठल देशमुख उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान, त्यांनी आज छताला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावला. ही घटना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आली. नातेवाईकांनी विठ्ठलला पुढील उपचारासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.

या घटनेची पैठण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तापस पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब ठोकळ करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news