छ. संभाजीनगर : विद्युत तारेचा स्पर्शाने ट्रकमधील तरूणाचा मृत्यू

छ. संभाजीनगर : विद्युत तारेचा स्पर्शाने ट्रकमधील तरूणाचा मृत्यू

Published on

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथे विद्युत वाहिनीच्या तारेचा स्पर्श झाल्याने कंटेनरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२६) रात्री जैनस्पिनर फाट्यावर घडली. सद्दाम हरुण शेख (वय ३०, रा. गणेशनगर पिंपळवाडी, पैठण) असे या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पैठण एमआयडीसीतील पेप्सी कंपनीत मालवाहतुकीसाठी कंटेनर चालक आला होता. त्याला पानटपरीतून काही वस्तू घ्यायच्या असल्याने त्याने आपला कंटेनर जैन स्पिनर फाट्यावरील नाथ तंत्र निकेतन कॉलेज समोर उभा केला. या कंटेनरच्या वरच्या बाजूला महावितरणाच्या विद्युत वाहिनीच्या तारा गेल्याने या तारेला कंटेनरला स्पर्श झाल्याचे चालकाच्या लक्ष्यात आले नाही. यादरम्यान पेप्सी कंपनीतील ट्रान्सपोर्टचे काम पाहणाऱ्या सद्दाम शेख हा ट्रकला हात ठेवून उभा होता. यादरम्यान ट्रकमध्ये विद्युत पुरवठा उतरल्यामुळे विजेच्या जोरदार धक्का लागून सद्दामचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसांत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news