बीड: हायवा- छोटा हत्ती गाडीची धडक; ३ जण जखमी

बीड: हायवा- छोटा हत्ती गाडीची धडक; ३ जण जखमी

धोंडराई, पुढारी वृत्तसेवा: भरधाव हायवा आणि छोटा हत्तीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.७) दुपारी १२च्या सुमारास बेलगाव फाट्याजवळ घडली. जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लक्ष्मण सगळे (वय २१, रा. तळणेवाडी, ता. गेवराई), गणेश महादेव मोहिते (वय २०, रा. तळणेवाडी) शरद नारायण मोहिते (वय १६, तळणेवाडी) हे तिघेजण जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऊमापूर शेवगावकडून येणाऱ्या (एम एच १२ एलटी ७७६५) हायवाची बेलगाव फाट्यानजीक आज दुपारी तळणेवाडीकडे जाणाऱ्या छोटा हत्तीची (एमएच १६ ऐवाय ०५७९) समोरासमोर धडक झाली. यात छोटा हत्तीतील तीन जण जखमी झाले. अपघातानंतर हायवा चालक फरार झाला आहे. छोटा हत्ती गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news